Saturday, September 24, 2011

भूमिका

'पुन्हा एकदा कविता' ह्या ना. धों. महानोर व चंद्रकान्त पाटील यांनी संपादित केलेल्या पुस्तकातला मजकूर

स्वतःच्या कवितेविषयीच्या भूमिकेबाबत १९७५मध्ये तुळशी परब यांनी अनिल बांदेकरांना लिहून दिलेल्या विस्तृत पत्राचा हिंदी अनुवाद 'आवेग : २१'मध्ये प्रकाशित झाला होता. खालचा उतारा त्यातून घेतला आहे.

'..... बदलत्या वास्तवात गतिशीलता बघण्याचा प्रयत्न याच काळातला.
पण वास्तवात अनेक गोष्टी असतात. आपलं वय असतं.
संवेदनशीलता असते. बाहेरचं जग असतं आणि सगळ्याहून थोर असे आपले दोस्त असतात. त्या सगळ्यांसोबतच आपण काही समजून घेत असतो.... या सगळ्यांतून आत्मविश्वास मिळवण्यासाठी आणि बाहेरच्या जगाचं आकलन करून घ्यावं म्हणून मी एका वेगळ्याच भाषेच्या शोधात होतो.... आम्ही सगळ्यांनी मिळून साहित्यातल्या जुन्या गोष्टी, रोमँटिक अंधश्रद्धा, जगण्यापासून पाठ फिरवण्याचा भित्रेपणा कायमचा फेकून देण्याचा प्रयत्न केला.... एकाकी लढणं अशक्य होतं. चुकीचंही. लक्षात आलं की लढायचं असेल तर राजकारणाशिवाय अशक्य आहे. मग कवितेवर प्रेम करणारे लोक हळूहळू वास्तवातील जगण्यावर प्रेम करू लागले. आपलं सामूहिक जीवन समजून-उमगून घेण्याच्या आणि ते बदलण्याच्या प्रयत्नात लागले.... जीवनावरचं प्रेम वाढत गेलं. आधी नुस्तंच कविता लिहिणं होतं, आता कवितेतून लोकांकडं आणि लोकांकडून कवितेकडं असा एक अखंड प्रवास सुरू झाला.....'

No comments:

Post a Comment